

Baramati
esakal
माळेगाव: उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती यांच्या वतीने खांडज (ता. बारामती) येथील बेंदचारीच्या खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. शेतीचा निचरा सुरळीत होण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या या कामासाठी सौ. सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांनी पोकलेन मशीन मोफत उपलब्ध करून दिले. परिणामी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.