आसू - खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड विषयक प्रशिक्षण

आसू - खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवड विषयक प्रशिक्षण
Published on

खंडाळ्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीचे प्रशिक्षण

फलटणच्या उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयात अभ्यासदौरा; ५० शेतकऱ्यांचा सहभाग

आसू, ता. १० ः फलटण येथील श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयात वनराई प्रकल्प, पुणे व एशियन पेंट्स, खंडाळा यांच्या वतीने खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवडविषयक प्रशिक्षण व अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात हरिपूर, अंबरवडी, अजनोज, पाडळी व बोरी येथील एकूण ५० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाला फळबाग लागवड प्रशिक्षक प्रा. ए. डी. पाटील, उद्यानविद्या विभागाचे प्रा. एन. ए. जाधव व प्रा. ए. ए. शिंदे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते, तसेच श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी शेतकरी व मार्गदर्शकांचे स्वागत केले.

प्रा. ए. डी. पाटील यांनी आंबा, पेरू व अंजीर या फळपिकांची आधुनिक पद्धतीने लागवड करून उत्पादनवाढ कशी साध्य करता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. योग्य वाणांची निवड, रोपांची लागवड पद्धत, अंतर व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन तसेच रोग व कीड नियंत्रण याविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. उद्यानविद्या विभागाचे प्रा. एन. ए. जाधव यांनी फळबाग रोपवाटिका व्यवस्थापन व रोपांची निगा राखण्याच्या पद्धती याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तर प्रा. ए. ए. शिंदे यांनी फळ काढणीपश्चात तंत्रज्ञानावर मार्गदर्शन करत फळांची योग्य परिपक्वतेवर काढणी, वर्गीकरण, पॅकिंग, साठवणूक व प्रक्रिया याबाबत माहिती दिली, तसेच मूल्यवर्धनाच्या संधींबाबत शेतकऱ्यांना जागरूक केले.

अभ्यासदौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांनी महाविद्यालयातील फळबाग रोपवाटिका, प्रात्यक्षिक प्लॉट, श्रीराम बेकरी, दुग्ध पदार्थ प्रयोगशाळा, जैविक खते प्रयोगशाळा, गांडूळखत प्रकल्प, माती परीक्षण प्रयोगशाळा, सेंद्रिय शेती विभाग तसेच मशरूम उत्पादन तंत्रज्ञान या विविध उपक्रमांना भेट देऊन माहिती घेतली. या प्रशिक्षणातून आधुनिक पद्धतींचे फळबाग व्यवस्थापन व काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणाचे आयोजन केल्याबद्दल शेतकऱ्यांनी महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले.

02549
फलटण : येथील उद्यानविद्या व कृषी महाविद्यालयाच्या भेटीप्रसंगी शेतकरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com