वडज येथील श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या अश्वाचा मृत्यू छळामुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

horse

वडज येथील श्री खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या अश्वाचा मृत्यू छळामुळे

नारायणगाव - वडज (ता. जुन्नर) येथील श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या पवित्र अश्वाचा मृत्यू प्रशिक्षकाच्या अमानुष छळा मुळे झाला आहे. या घटनेला देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, मुख्य व्यवस्थापक व प्रशिक्षक जबाबदार आहेत.या प्रकरणी चौकशी करून संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार वडज ग्रामपंचायत सरपंच सुनील चव्हाण, माजी उपसरपंच सुभाष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

तक्रार अर्जात म्हटले आहे की, भाविक तानाजी शिंदे यांनी सात वर्षापूर्वी श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टला अश्व(घोडा) दान केला होता.देवस्थान ट्रस्टने ग्रामस्थांनला विश्वासात न घेता हा घोडा परस्पर नारायणगाव येथील प्रशिक्षक रमेश पवार यांच्याकडे नाच शिकवण्यासाठी दिला.प्रशिक्षन देता असताना पवार यांनी घोड्याचा अमानुष छळ केला.या मुळे श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या घोड्याचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती ग्रामस्थांना न देता शवविच्छेदन न करता विश्वस्तांनी घोड्याचा परस्पर अंत्यविधी करून टाकला. तरी या प्रकरणी चौकशी करून देवस्थान ट्रस्टचे नऊ विश्वस्त, मुख्य व्यवस्थापक व प्रशिक्षक यांच्यावर प्राणी छळ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरपंच सुनील चव्हाण, माजी सरपंच सुभाष चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विजय चव्हाण, विवेक चव्हाण म्हणाले सर्व विश्वस्तांच्या परवानगीने अश्वाचा( घोडा) प्रशिक्षणासाठी नारायणगाव येथे दिला होता. घोडा चावत होता. हृदयविकाराने घोड्याचे निधन झाले असल्याचे स्थानिक पशुवैद्यक डॉक्टरांनी डॉक्टरांनी विधान केले होते. त्यानंतर अश्वाचा अंत्यविधी करण्यात आला. घोडा प्रशिक्षणासाठी देण्या मागची भावना शुद्ध होती. जीवन मृत्यू कोणाच्या हातात नाही. मात्र विश्वस्तांना बदनाम करण्यासाठी या घटनेचे काही जणांनी राजकारण सुरू केले आहे. या प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी आम्ही तयार आहोत.

या प्रकरणी प्राप्त तक्रार अर्जा नुसार चौकशी सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही

- पृथ्वीराज ताटे, सहायक पोलीस निरीक्षक, नारायणगाव पोलिस स्टेशन.

Web Title: Khanderai Devasthan Horse Dies Due To Torture Sarpanch Sunil Chavans Complaint

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..