खानदेशात तेलबिया पेरणी स्थिर राहणार

खानदेशात तेलबिया पेरणी स्थिर राहणार
Published on: 

खानदेशात तेलबिया पेरणी स्थिर राहणार

भुईमूग पेरा किंचित घटण्याची शक्यता

ॲग्रोवन वृत्तसेवा
जळगाव : खानदेशात तेलबियांची पेरणी स्थिर राहणार आहे. सणासुदीमुळे सूर्यफूल पेरणी रखडली आहे. भुईमूग पेरणी सातपुडालगत बऱ्यापैकी होईल, असे दिसत आहे. पण भुईमूग पेरणी काहीशी कमी राहू शकते, असाही अंदाज आहे.

खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड डिसेंबरमध्ये सुरू होईल. यंदा क्षेत्रात किंचित घट होईल, असे चित्र आहे. सूर्यफूल पेरणी पुढील आठवड्यातही होईल, असेही संकेत होते, पण सणासुदीमुळे अडचणी असल्याचे दिसत आहे.

---- चौकट ----
आगाप लागवडी होणार
आगाप भुईमुगाची पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस अनेकांनी करण्याचे नियोजन केले आहे. डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग येवू शकतो. मागील वेळेसही डिसेंबरमध्ये भुईमूग पेरणी गतीने सुरू झाली होती. अनेकांनी पेरणी नोव्हेंबरअखेरीस तुषार सिंचनाच्या मदतीने करण्याचे नियोजन केले आहे. सर्वाधिक पेरणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देतील, असेही संकेत आहेत.

---- चौकट----
पेरा स्थिर राहणार
मागील हंगामात खानदेशात सुमारे ९०० हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. यंदा ही पेरणी सुमारे ७५० ते ८०० हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. मागील वेळेस पाऊसमान बरे होते. जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागात गिरणा धरणातून रब्बीसाठी आवर्तन मिळाल्याने रब्बी चांगला होता. यंदाही अनेक सिंचन प्रकल्प १०० टक्के भरले. पण काही भागात टंचाई तयार होईल. कारण पाऊसमान कमी होते. सूर्यफुलासह भुईमुगाची पेरणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, भडगाव, एरंडोल, धुळ्यातील साक्री, धुळे या भागात काहीशी कमी होईल. कारण या भागात जानेवारीतच टंचाईची समस्या तयार होवू शकते, अशी चिंता आहे.

---- चौकट ----
गिरणा पट्ट्यात पेरा
खानदेशात जळगावातील गिरणा पट्टा, धुळ्यातील शिरपूर, सातपुडा पर्वतालगतच्या भागात भुईमुगाची पेरणी होईल. तसेच सातपुड्यालगत जळगावातील यावल, चोपडा, नंदुरबारातील तळोदा भागात पेरणी स्थिर असणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सर्वाधिक पेरणी होईल, अशी माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.