मेदनकरवाडीत भंडारा खोबऱ्याची उधळण
चाकण, ता. १ : मेदनकरवाडी (ता. खेड) येथील पुरातन खंडोबा देवाच्या माघी पौर्णिमा यात्रेत देवाचे तसेच बारागाड्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राज्यभरातून सुमारे दोन लाख भाविक आले. मंदिरात भाविकांकडून भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात येत होती.
‘खंडोबा महाराज की जय’, ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’, ‘येळकोट, येळकोट जय मल्हार’च्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मेदनकरवाडीतील माघी पौर्णिमा यात्रेनिमित्ताने पहाटेपासून मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. देवाला महापूजा, हारतुरे करण्यात आले. मानाच्या पूजन केलेल्या गाड्याला भाविकांकडून पाणी वाहून नैवेद्य अर्पण करण्यात येत होते. भाविक तळीभंडार करत होते. यावेळी बैलांच्या वाजंत्री, वाद्यांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक होत होत्या.
यात्रेदरम्यान नवसाच्या बगाडाची मिरवणूक झाली. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आकर्षक फुलांची सजावट केली होती. देवाच्या मूर्तीही आकर्षक फुलांनी सजविल्या होत्या.
दरम्यान, मंदिर परिसरात नारळ, तळी, भंडार, हार फुले, हॉटेल, हातगाड्या, खेळणी व इतर दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली होती. त्यावर लहान मुलांची, महिलांची तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता. यात्रेचे आयोजन देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष, पदाधिकारी, यात्रा कमिटी तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी केले होते.
10095, 10096
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

