

पुणे, ता. २८ : श्री खंडोबा देवाच्या अवताराचे चरित्र रांगोळीच्या माध्यमातून अनुभवता येणाऱ्या ‘जय मल्हार’ प्रदर्शनाचे आयोजन श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनने केले आहे. बालगंधर्व कलादालनात हे प्रदर्शन गुरुवार (ता. ३०) ते रविवार (ता. ३) दरम्यान दररोज सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.
अभिनेते देवदत्त नागे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनचे प्रा. अक्षय शहापूरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनात ३० आकर्षक रांगोळ्यांमधून श्री खंडोबा चरित्र साकारणार असून, यात १०० विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. प्रत्येक रांगोळीसाठी ४० ते ४८ तासांचा कालावधी लागत असून, ५०० किलो रांगोळीचा वापर करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.