कऱ्हाड गणेशोत्सवात कऱ्हाडकरांच्या रात्री ''जाग्या''

कऱ्हाड गणेशोत्सवात कऱ्हाडकरांच्या रात्री ''जाग्या''
Published on

विद्युतरोषणाईसह जिवंत देखाव्‍यांना पसंती

कऱ्हाडकरांच्या रात्री ‘जाग्‍या’; पंचक्रोशीतून आबालवृद्धांची गर्दी, वाहतूकही सुरळीत

कऱ्हाड, ता. २२ : कऱ्हाडात मन प्रसन्न करणारी विद्युतरोषणाई आणि शतकोत्तरानंतरही परंपरा जपणारे पौराणिक जिवंत देखावे... अशा कऱ्हाडच्या वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सध्या पंचक्रोशीतील कऱ्हाडकरांच्या रात्री अक्षरशः ‘जाग्या’ राहू लागल्या आहेत. सर्व जण रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरत असल्याने शहरात भक्ती अन् उत्साहाचा सागर उसळत आहे.
शहर आणि परिसरात यंदा दोनशेहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. कऱ्हाडच्या गणेशोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील पौराणिक जिवंत देखावे. व्यावसायिक कलाकारांवर अवलंबून न राहता मंडळाचे स्वतःचे कार्यकर्तेच वेगवेगळ्या पात्रांच्या भूमिका साकारतात, ही कऱ्हाडची स्वतंत्र ओळख आहे. आझाद चौक भोई गल्लीतील ''नवजवान गणेश उत्सव मंडळा''ने यंदा साकारलेला ''हिरण्यकश्यपू वध'' सध्या चर्चेतील देखावा ठरत आहे. तो पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दत्त चौकापासून पुढे सरकताना उत्सवाचा उत्साह द्विगुणित होतो. दत्त चौकातील नवभारत आणि नंदकुमार क्रीडा गणेश मंडळाने दर वर्षीप्रमाणे पारंपरिक अन् डोळ्यांचे पारणे फेडणारी विद्युतरोषणाई केली आहे. मुख्य बाजारपेठेतील विठ्ठल चौकात भव्य मंदिराची आरास उभारण्यात आली आहे.

..............................................
चौकट

पोलिसांचे चोख नियोजन
देखावे पाहण्यासाठी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी शहरात वाहतुकीचे योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होताना दिसते आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वाहतुकी शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे स्वतः त्यावर लक्ष ठेवून रात्री फिरताना दिसतात. त्यासह ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात आहे.
................................

कोठे काय पाहाल

शुक्रवार पेठ ः स्वतंत्र खुशबू गणेश मंडळाचा - श्रीकृष्णाचा हलता देखावा
शुक्रवार पेठ - जय जवान जय किसान गणेश मंडळ - मंदिराची प्रतिकृती, आकर्षक विद्युतरोषणाई
डुबल गल्लीत - भुताचा जिवंत देखावा
मंगळवार पेठ - ज्योतिर्लिंग गणेश मंडळाचे रोजचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम
मंगळवार पेठ - उदय गणेश मंडळ - मेंटल हॉस्पिटल
मंगळवार पेठ - ऐतिहासिक जिवंत देखावा
पावसकर गल्ली - श्रीकृष्ण गजानन मंडळ - हिमालयीन गुफा
रविवार पेठ - हिरण्यकशिपू वधाचा देखावा
रविवार पेठ - छत्रपती गणेश मंडळ - भुताचा जिवंत देखावा
रविवार पेठ - देवांग गणेश मंडळ - काल्पनिक मंदिराची प्रतिकृती
शनिवार पेठ - आपले गणेश मंडळ - भुताचा देखावा
शनिवार पेठ - न्यू नवहिंद गणेश मंडळ - अजिंठा वेरूळ मंदिर प्रतिकृती

PNE26W52041
कऱ्हाड : कन्या प्रशालेसमोरील कमानी मारुती मंडळाने उभारलेल्या ऐतिहासिक जिवंत देखाव्यातील क्षण.

PNE26W52042
कऱ्हाड : रविवार पेठेतील आझाद चौकातील नवजवान गणेश नवरात्रोत्सव मंडळाचा नृसिंह अवतार देखाव्यातील क्षण.

PNE26W52044
कऱ्हाड : मंगळवार पेठेतील ज्योतिर्लिंग गणेश मंडळाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील एक क्षण.
............................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com