Local Dispute Turns Tragic in Kharadi
Sakal
पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून मित्राच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने मारहाण करून आणि डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना खराडी परिसरात घडली. या प्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. ८) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.