
पुणे पोलिसांनी उच्चभ्रू खराडी परिसरातील एका फ्लॅटवर सुरु असलेल्या रेव्हपार्टीवर छापा टाकला. या छाप्यात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना देखील अटक करण्यात आली आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खेवलकर यांच्यासह 2 महिला आणि 4 पुरुषांच यांचाही या पार्टीत समावेश असल्याचे समोर आले आहे. पाच दिवसांपूर्वी रोहिणी खडसे-खेवलकर यांनी राज्यातील चर्चित हनी ट्रॅप प्रकरणावर कवितेतून टोलेबाजी केली होती, मात्र आता त्यांचे पतीच रेव्ह पार्टी करताना आढळल्याने खळबळ माजली आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.