

कऱ्हाड पालिकेकडून एक कोटीची उधळपट्टी
भीमशक्तीची जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी; वसुलीसाठी आक्रमक
कऱ्हाड, ता. १८ ः शहरात पालिकेच्या बारा डबरी येथील घनकचरा व्यवस्थापनाच्या शेजारील जागेत प्रत्यक्षात एकही विनामातीचे काम न करता तब्बल एक कोटी ८१ हजारांची उधळपट्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. लाल माती टाकण्याचे कोणतेही काम न करताच खोटी बिले लाटण्यात आलेले सरकारी धन आणि त्या प्रकरणी प्रशासनाकडून होत असलेला दिरंगाईचा कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणातील दोषी संबंधित अधिकारी आणि राजलक्ष्मी इंडस्ट्रीजवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल कारावेत. त्यांच्याकडून एक कोटीची वसुली करावी, अशी भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.
भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे, काँग्रेसचे झाकिर पठाण, अखिल आंबेकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांनी यापूर्वी १२ ते १४ ऑगस्टदरम्यान तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनही केले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने वारंवार पत्रव्यवहार करत चौकशी करून फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते; परंतु आंदोलनाचे दोन महिने उलटून गेल्यानंतरही स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या टोलवाटोलवीच्या भूमिकेमुळे भीमशक्ती संघटना त्या विरोधात आक्रमक झाली आहे. प्रशासनाला जाब विचारण्यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे.
...........
चौकट
..............
व्याख्यानावेळी निदर्शने
पालिकेच्या शारदीय व्याख्यानमालेत काल (शनिवार) येथे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात व्याख्यान झाले. त्यावेळी भीमशक्ती संघटनेने स्मृतिसदनाबाहेर निदर्शने करत लोकांचे त्याकडे लक्ष वेधले. त्या आंदोलनात श्री. लादे, श्री. पठाण यांच्यासह त्यांचे सहकारी सहभागी झाले होते.
W59851
कऱ्हाड ः तुकाराम मुंढेंच्या व्याख्यानावेळी स्मृतिसदनाबाहेर निदर्शने करताना आनंदराव लादे, झाकिर पठाण आदी.
.....................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.