

A local youth rescued a man who was swept away while attempting to cross a flooded bridge over the Bhima River near Kharpudi in Khed taluka, highlighting the urgent need for a safer bridge.
Sakal
दावडी : चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने तसेच परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून सातत्याने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीला पूर आला असून खरपूडी बुद्रुक व खरपूडी खुर्द (ता. खेड) यांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे. अशा धोकादायक परिस्थितीत पुल ओलांडण्याचा प्रयत्न करणारा एक तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला. मात्र स्थानिक युवकाच्या धाडसी प्रसंगावधानामुळे त्याचा जीव थोडक्यात बचावला.