

Kharpudi Budruk Khurd bridge submerged due to Bhima River flood after Chaskaman Dam water release
Sakal
दावडी : चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असून, खेड तालुक्यातील खरपूडी बुद्रुक व खरपूडी खुर्द या गावांना जोडणाऱ्या भीमा नदीवरील पुलावरून सलग तीन दिवस पाणी वाहत आहे. परिणामी दोन्ही गावांतील संपर्क पूर्णपणे तुटला असून ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.