Video : अन् पालकमंत्री अजित पवार यांच्याबाबत पुण्याचे खासदार बापट म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

पुण्यातील १०० नगरसेवक, 6 आमदार, १ खासदार या नवीन अधिकाऱ्यांसोबत चौकीदार म्हणून काम करतील. प्रत्येक वॉर्डात काम करतील, आम्ही आराखडा तयार करून देणार आहोत. असे खासदार गिरिश बापट यांनी सांगितले.

पुणे : ''शहरात भाजपचे 100 नगरसेवक 6 आमदार आहेत, हे सर्वजण आता प्रत्येक वार्डात कोरोना विरोधात चौकीदार म्हणून रस्त्यावर उतरणार आहेत. कोरोनाच्या बाबतीत आता कुठलंच राजकारण करायच नाही, आमच्याकडून राजकारण केलं नाही, करणार नाही. पालकमंत्री अजित पवार काम करत आहेत, त्यांना भाजपकडून सहकार्य राहील.'' खासदार गिरीश बापट, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालिकेत कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नेमलेल्या विविध आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी वरिल माहिती दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बापट पुढे म्हणाले, ''कोरोनाचा प्रसार कमी व्हावा म्हणून मास्क, सॅनिटायजर वाटणे, अन्नधान्य देणे सोबत रुग्णांना ऍम्ब्युलन्स, व्हेंटिलेटर अशी मदत मिळवून देणे यावर भर असेल. चाचण्या वाढत आहेत म्हणून बाधित रुग्ण सापडत आहेत, यामुळे नागरिकांनी घाबरू नये.'' 

पुण्यातील १०० नगरसेवक, 6 आमदार, १ खासदार या नवीन अधिकाऱ्यांसोबत चौकीदार म्हणून काम करतील. प्रत्येक वॉर्डात काम करतील, आम्ही आराखडा तयार करून देणार आहोत. जी मदत कमी पडेल ती प्रशासनला करून देऊ, पॅटर्न काय असावा तो महापालिकेने ठरवावा. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी फिरू नका. ५० टक्के खाजगी डॉक्टर फक्त उघडे आहेत. त्यांनाही लागेल ती मदत देऊ, असेही बापट म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ते पुढे म्हणाले, ''महापालिका कामाच्या बाबतीत समाधानी आहे, पण अजून चांगले काम केलं पाहिजे. मी पालकमंत्री असताना जस काम केलं अस सगळेच काम करतील अशी अपेक्षा आहे. सर्वांनी म्हणजे अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khasdar Girish Bapat said that Guardian Minister Ajit Pawar is doing a good job