खटाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद खाडे

खटाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद खाडे
Published on

खटाव तालुका शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद खाडे
वडूज, ता. १० : खटाव तालुका शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात अखिल भारतीय शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सिद्धेश्वर पुस्तके यांच्या उपस्थितीत तालुका अध्यक्षपदी प्रमोद खाडे, सरचिटणीसपदी कृष्णात फडतरे यांची फेरनिवड झाली.
या वेळी सल्लागार तुकाराम कदम, विष्णू खताळ, महेंद्र जानुगडे, मा. ए. खाडे, तुकाराम ढगे, जिल्हाध्यक्ष मोहनराव निकम, समीर बागवान, साबिरा मुल्ला, बंडोबा शिंदे, नवनाथ कणसे, राजाराम खाडे, नवनाथ खरमाटे, आनंदा खाडे, राजेंद्र बागल, अर्जुन जाधव, जगन्नाथ खाडे, राजाराम तोरणे, भारत देवकांत आदी उपस्थित होती.
या वेळी श्री. पुस्तके, श्री. खाडे, श्री. ढगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा आदर्श शिक्षक रूपाली सुतार, यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त धनंजय क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. शंकर देशमाने यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी तालुका कार्यकारिणीच्या नेतेपदी संजय सुतार, कार्यकारी अध्यक्षपदी सचिन शिंदे, कार्याध्यक्षपदी ओंकार पवार, कोषाध्यक्षपदी शरद शेटे, प्रवक्तेपदी तानाजी कांबळे, सल्लागारपदी आलमगीर मुल्ला, प्रसिद्धिप्रमुखपदी दत्ता साठे, किरण खरात, संपर्क प्रमुखपदी राम पवार, संजय चव्हाण, बापूराव गोफणे, कार्यालयीन चिटणीस शरद माळवे, उपाध्यक्षपदी धनाजी थोरवे, रवींद्र फडतरे, सचिन मोरे, अभय कदम, सुहास खाडे, सुनील पवार, निळकंठ काळे, जालिंदर कदम, काका विधाते, रावसाहेब चव्हाण, विजय सूर्यवंशी, राजाराम खाडे, तुषार खरात, राजेंद्र गुरव, रमजान आतार, महिला आघाडीच्या प्रज्ञा खरमाटे, पूनम माने, भाग्यश्री बागल, मनीषा निकम, रूपाली सुतार, शुभांगी गोरे, संगीता पिसाळ, उमा रणशिंग, संध्यारानी पानसरे, सीमा मंगरुळे, मीरा शिरसाट, सुषमा फडतरे आदींच्या विविध पदांवर निवडी करण्यात आल्या.

W48575
वडूज : शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात नूतन अध्यक्ष प्रमोद खाडे यांचा सत्कार करताना सिद्धेश्वर पुस्तके व मान्यवर. (आयाज मुल्ला ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com