खटाव तालुक्यात २ लाख ४० हजार मतदार; कातरखटाव गटात सर्वाधिक तर औंधला सर्वात कमी मतदार
खटाव तालुक्यात दोन लाख ४० हजार मतदार
कातरखटाव गटात सर्वाधिक, तर औंधला सर्वात कमी मतदार
पुसेगाव, ता. २३ : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी खटाव तालुक्यातून एकूण दोन लाख ४० हजार १६९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सात गट आणि १४ गणांतील उमेदवारांच्या निवडणुकांसाठी तालुक्यात ३०९ मतदान केंद्रांची रचना करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी दिली.
खटाव तालुक्यात स्त्री मतदारांची एकूण संख्या १,१८,४८९, तर पुरुष मतदारांची एकूण संख्या १,२१,६७५ आहे. इतर पाच मतदार आहेत. तालुक्यातील एकूण मतदारांची संख्या २,४०,१६९ आहे. कातरखटाव जिल्हा परिषद गटात सर्वाधिक ३६,६५३ मतदार असून, या गटात ४९ मतदान केंद्रे आहेत. त्याखालोखाल बुध गटात ३६,२८८ मतदार आहेत. खटाव गटात ३४,७७७, पुसेसावळीत ३४,०८५, निमसोड ३३८८८, मायणी ३२६१९, औंध गटात ३१,८५९ मतदार आहेत. पंचायत समितीच्या बुध गणात सर्वाधिक १८७७६, तर कातरखटाव गणात १८,६७९ मतदार आहेत. औंध गटात ४१, पुसेसावळी ४२, मायणी ३८, बुध ४९, खटाव ४४, कातरखटाव ५१ आणि निमसोड गटात ४४ अशा तालुक्यात एकूण ३०९ मतदान केंद्रांची रचना करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

