

Two Bhama River Bridges in Khed Closed for Heavy Vehicles
Sakal
आंबेठाण : भामा नदीवरील ( ता.खेड ) दोन पूल जीर्ण झाल्याने त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.नागरिकांच्या आणि सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टिकोनातून विभागाचा हा निर्णय जरी योग्य असला तरी यामुळे अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना मात्र मोठा वळसा घालून इच्छित स्थळी जावे लागणार आहे.खेड तालुक्यातील भामा नदीवरील शेलु ते कुरकुंडी आणि कोरेगाव खुर्द ते कोरेगाव बुद्रुक या गावांना जोडणारा कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.