

Road Repair Demand Khed-Kanersar Road
esakal
दावडी : खेड तालुक्यातील खेड-कनेरसर मार्गावरील रेटवडी, मांडवळा आणि होलेवाडी परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे यापूर्वी काही दुचाकीस्वार अपघातात जखमी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत, तर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.