

खेडला लता फरांदेंच्या
सरपंचपदावर अखेर गदा
सातारा, ता. ७ : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खेडच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती लता अशोक फरांदे यांना आर्थिक अपहाराच्या कारणावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने अपात्रतेचा निकाल दिला आहे. त्यानुसार त्यांच्या सरपंचपदावर गदा आली असून, याबाबत श्रीमती फरांदे यांनी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून होणारा निर्णय आम्हास मान्य असेल, असे स्पष्ट केले आहे.
खेड ग्रामपंचायत निधीमधील १६ लाख ७७ हजार १४३ रुपयांच्या आर्थिक अपहाराबाबत साहिल शेख (रा. खेड), अभिजित खेडकर, उल्हास अग्निहोत्री आणि अभिषेक हरिदास यांनी तक्रार दाखल केली होती. यावरून सरपंच फरांदे यांना दोषी ठरवत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांना पदावरून हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे श्रीमती फरांदे यांनी अपील दाखल केल्यावर श्री. गोरे यांनी अपिलार्थी व प्रतिवादींचे मुद्दे तपासून घेणे आवश्यक वाटत असल्यामुळे विभागीय आयुक्तांच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर या स्थगिती आदेशाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे रिट याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयाने विभागीय आयुक्तांचे आदेश व कागदपत्रांचे अवलोकन करून ग्रामविकासमंत्री गोरे यांनी दिलेला स्थगिती आदेश ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रद्द केला आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत खेडमध्ये सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे रिक्त असल्याने गटविकास अधिकारी श्री. संसारे यांनी प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी श्री. काकडे यांची नियुक्ती केली आहे.
...........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.