esakal | किवळे गावाच्या कोतवालाची चाकूने वार करून हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

किवळे गावाच्या कोतवालाची चाकूने वार करून हत्या

किवळे गावाच्या कोतवालाची चाकूने वार करून हत्या

sakal_logo
By
राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील किवळे गावाच्या कोतवालाची, चालत्या दुचाकीवर चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी ११ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. रमजान आदमभाई शेख ( वय ४२ , रा. किवळे, ता. खेड ) असे हत्या झालेल्या कोतवालाचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळ्याचे कोतवाल रमजान शेख आणि रफिक पमा शेख ( रा. अहिरे, ता. खेड ) हे आते-मामे भाऊ होते. ते शनिवारी पाईट रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये बसले होते. त्यावेळी अज्ञात कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर रमजान यांनी फोन करून चंद्रकांत सुदाम शिवले ( रा. किवळे, ता. खेड) यांना, 'आमचे मिटले आहे, तुम्ही दुचाकी घेऊन मला घ्यायला हॉटेलवर या', असे सांगितले. त्यांना चांदूस येथे जमीन पाहावयास जायचे होते.

हेही वाचा: Pune Live Update - कुठे गर्दी, कशी सुरु आहे वाहतूक?

दुचाकीवर शिवलेंच्या मागे रमजान बसले. त्यावेळी मीही येतो म्हणत, रफिकही रमजानच्या मागे ट्रीपलसीट बसला. दुचाकी चांदूसकडे जात असताना, रफिकने मागून रमजान यांच्या मानेवर चाकूने वार केले आणि दुचाकीवरुन उडी मारून तो पळून गेला. या हल्ल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या रमजान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवले यांनी फिर्याद दिली. खेड पोलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड करीत आहेत.

loading image
go to top