ओव्हर ब्रिज वरून बसेस गेल्याने विद्यार्थ्यासह नागरिकांची गैरसोय विद्यार्थ्यासह नागरिकातून संताप
खुडूस एसटी थांब्याचा फोटो येणार आहे. नाही आल्यास एसटी बसचा संग्रहित फोटो घ्यावा.
---
खुडूस बस थांबा दुर्लक्षित; विद्यार्थ्यांची कोंडी
ओव्हरब्रीजवरून बस जात असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. ३१ : खुडूस (ता. माळशिरस) येथे अधिकृत एसटी बस थांबा असतानाही, गेल्या महिन्यापासून काही एसटी बस ओव्हरब्रीजवरून जात असल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत खुडूस ग्रामपंचायतीने ठराव करूनही अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
खुडूस गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजार असून, अनेक वाड्या- वस्त्यांशी हे गाव जोडलेले आहे. त्यामुळे बस थांब्यावर प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. खुडूस येथून नातेपुते, सदाशिवनगर व माळशिरस येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, वेळेवर येणाऱ्या बस गावात न थांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, नागरिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या बस थांब्यावर सर्व एसटी बसगाड्या थांबाव्यात, यासाठी ग्रामपंचायतीने अधिकृत ठराव करून संबंधित विभागाकडे पाठवला आहे; तरीही या मार्गावरील काही लांब पल्ल्याच्या बसगाड्या वाहतूक नियंत्रकांच्या सूचनांनंतरही ओव्हरब्रीजवरूनच जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळा व महाविद्यालयांत वेळेत पोचणे विद्यार्थ्यांना अवघड झाले आहे. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. बस थांब्यावर गाड्या न थांबल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
---
कोट
चालकांना खुडूस बस थांब्यावर बस थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांच्या लॉगशीटवरही याबाबत शिक्का मारण्यात आला आहे.
- कटके, वाहतूक नियंत्रक, माळशिरस
---
कोट
काही दिवसांत परीक्षा सुरू होत आहेत. एसटी बसगाड्या थांबत नसल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. बसचालकांना कडक ताकीद देणे आवश्यक आहे.
- ओम बनकर, विद्यार्थी, खुडूस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

