Manchar Crime : डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक; गावठी पिस्तूलही जप्त

'आम्ही तुझा खून करायची सुपारी घेतलेली आहे. तुला जीव वाचवायचा असेल, तर आम्हाला २० लाख रुपये द्यावे लागतील.
Crime
Crimesakal
Updated on

मंचर - पेठ (ता. आंबेगाव) येथे खासगी दवाखाण्यातील डॉ. कैलास रघुनाथ वाळे (रा. मंचर, ता. आंबेगाव) यांचे ता.४ जानेवारी रोजी अपहरण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यातील चार जणांना मंचर पोलिसांनी अटक केली. पण फरारी असलेला प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय-३२ वाळद, ता. खेड) या आरोपीला आळेफाटा (ता. जुन्नर) येथे बसस्थानकावर आळेफाटा पोलिसांनी शनिवारी (ता. १५)अटक केली आहे. आरोपीकडून गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

डॉ. वाळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी योगेश चौधरी, मनोज कडलग, पवन थोरात, डेली ऊर्फ तुषार टेके या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. प्रवीण ओव्हाळ व आदिनाथ नाईकरे हे फरार झाले होते.

घडलेल्या गुन्ह्याची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेतला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस अंमलदार दिपक साबळे, अक्षय नवले, संदिप वारे, राजू मोमीण, मंगेश चिगळे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर यांनी आरोपी ओव्हाळला अटक केली आहे. पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून डॉ. वाळे मंचरला घरी जात असताना मोटारीने त्यांना पाठीमागून धडक दिली. मोटारीतील तिघांनी त्यांना मारहाण करत जबरदस्तीने मोटारीत बसवून निघोटवाडी जंगलात डोंगरावर नेले. 'तू आम्हाला ओळखतो का? आम्ही सर्व या भागातील भाई आहोत.

गुन्हेगारी आमचा पेशा आहे,' असे म्हणत मारहाण करत वाळे यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला. थोरात याने पिस्तुलने गोळीबार करून 'आम्ही तुझा खून करायची सुपारी घेतलेली आहे. तुला जीव वाचवायचा असेल, तर आम्हाला २० लाख रुपये द्यावे लागतील,' असे सांगितले.

घाबरलेल्या वाळे यांनी '१५ लाख रुपये देतो. मला काही वेळ द्या,' असे सांगितले. त्यानंतर डॉ. वाळे यांना घोडेगावला नेले. वाळे यांनी शरद बँकेतून एक लाख रुपये रक्कम काढून ओव्हाळकडे दिली. त्यानंतर राजगुरूनगर बाह्यवळण रस्त्यावर मोटार थांबवली. तेथे चौधरी व कडलग आले.

'तू नादी लागू नको, आम्ही पोलिस ठाण्यात तुझ्याविरुद्ध विनयभंगाची केस करणार आहोत. केस मिटवायची असेल, तर आणखी दोन लाख रुपये द्यावे लागतील,' असे म्हणत चौधरी याने डॉ. वाळे यांना मारहाण केली. पोलिसांत तक्रार दिली, तर जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर रात्री डॉ. वाळे यांना पेठ येथे सोडून दिले. त्यानंतर डॉ. वाळे यांनी मंचर पोलिसांत धाव फिर्याद दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com