Pargaon Crime
sakal
पारगाव - ता. आंबेगाव येथील विवाहित मुलीचे इच्छेविरुध्द दुसरे लग्न लाऊन देण्याच्या उद्देशाने वडीलांनीच अपहरण केले होते. पारगाव कारखाना पोलिसांनी तत्पर कारवाई करत वडीलांसह एकुण सात आरोपींना अवघ्या चार तासांत अटक केली आहे. विवाहितेची सुटका करून पतीच्या हवाली केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.