Prithviraj Dalvi
sakal
नसरापूर - कापुरव्होळ येथील आनंद उद्योग समुहाचे लखनशेठ दळवी यांच्या अठरा वर्षीय मुलाचे कारमधून अपहरण करुन पळुन जाणाऱ्या अपहरणकर्त्यांचा पोलिस यंत्रणा व ग्रामसुरक्षा यंत्रणा यांनी सिनेस्टाईल नाकाबंदी करुन अवघ्या एक तासात मुलाला हस्तगत केले. मात्र यावेळी अपहरणात वापरलेली कार सोडुन अपहरणकर्त्यांनी पलायन केले. त्यांचा तपास राजगड पोलिस व जिल्हा गुन्हेशाखा करत आहेत.