वाई:-रोटरॅक्ट क्लब आयोजित केलेल्या ‘किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा’संपन्न; इतिहास व शस्त्र अभ्यासक मृण्मय अरभुणे यांचे मार्गदर्शन
विश्वजित जगताप, सुयश जमदाडे प्रथम
वाईत बक्षीस वितरण; खुल्या गटात शिव मित्र मंडळाची बाजी
वाई, ता. १८ : येथील रोटरॅक्ट क्लबने दिवाळीत आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात मोठ्या गटात विश्वजित जगताप, लहान गटात सुयश जमदाडे, तर खुल्या गटात शिव मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. येथील लोकमान्य टिळक सभागृहात विजेत्यांना नुकतेच बक्षीस वितरण झाले.
रोटरीच्या माजी प्रांतपाल स्वाती हेरकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रसिद्ध इतिहास व शस्त्र अभ्यासक मृण्मय अरभुणे (चंद्रहास) यांनी महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व शिवकालीन शस्त्रांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी इतिहास जपण्याची जबाबदारी तरुण पिढीवर असल्याचे सांगितले.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल असा (अनुक्रमे पहिले तीन व उत्तेजनार्थ क्रमांक) : लहान गट : सुयश जमदाडे, साई मालुसरे, नील डेरे, प्रणव नलावडे व आत्रेय खमकर, तर सार्थक गाडे व युगंधरा गायकवाड. मोठा गट : विश्वजित जगताप, आदित्य ढगे आदित्य बुर्से व स्वराज कवडे, पार्थ मिस्त्री, आदित्य जायगुडे, तर रुद्र जमदाडे, आदित्य काटे व अभिनव तळेकर. खुला गट : शिव मित्र मंडळ, शिव प्रतिज्ञा मंडळ, शिव स्वराज्य मंडळ, गोळीबार चौक. विशेष कौतुक पुरस्कार : राहुल भोसले (साक्षी शिल्प सोनगीरवाडी), श्लोक मालुसरे (श्रीराम कट्टा), श्री शिवराज बाल गणेश मंडळ, वेदराज अनपट, हर्ष पिसाळ, वेदांत सावंत, देवांश गायकवाड तसेच कॅन्सर योद्धा यांना प्रदान केले. आदित्य दुधाणे यांनी आभार मानले.
-----
07444
वाई : स्पर्धेतील विजेत्यांसमवेत स्वाती हेरकळ, मृण्मय अरभुणे, रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी.
.......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

