
Pune Crime
Sakal
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील मौजे मुंढावरे येथे झालेल्या खून प्रकरणात कामशेत पोलिसांनी अवघ्या पाच तासांत आरोपीला अटक केली आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला जेरबंद केले.