

VRG26B06286
पुणे : यावली ग्रामपंचायतीचे अधिकारी किरण वाघमारे यांना पुरस्कार प्रदान करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व इतर मान्यवर.
---
आदर्श अधिकारी पुरस्काराने किरण वाघमारेंचा सत्कार
वैराग : बार्शी तालुक्यातील यावली ग्रामपंचायतीचे अधिकारी किरण वाघमारे यांना त्यांच्या उत्कृष्ट शासकीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे येथील शिवाजीनगरमधील ॲग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद पुणेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भूषण जोशी, प्रकल्प संचालक शालिनी कडू, सिने अभिनेत्री शिवाली परब तसेच बार्शी तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ सुरवसे, राज्य कौन्सिलर रामेश्वर भोसले, मानसिंगराव जाधव, अशोक घुगे, राजाभाऊ मोहिते तसेच इतर ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.