पुणे : भक्तीची सर्वोच्च भावना असणारा विरह, नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व, भक्ती आणि भावाची एकरूपता, वारकरी संप्रदायातील संत स्त्रियांचे योगदान अशा विविध विषयांवरील संतांचे विचार पाच कीर्तनकारांनी आपल्या रसाळ वाणीतून पुणेकरांसमोर उलगडले. .प्रत्यक्ष आषाढी वारीत सहभागी होत आले नसले तरी ‘कीर्तनवारी’च्या निमित्ताने भाविकांनी संतमाहात्म्य जाणून घेत हरिनामाचा गजर केला. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह आणि भक्ती-शक्ती व्यासपीठातर्फे आयोजित संतचरित्र कीर्तन महोत्सवाचे. आषाढी वारी आणि आषाढी एकादशीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. सर्किट हाऊस क्रिएशन्स’च्या विशेष सहकार्यातून महोत्सव सादर झाला. ‘कोहिनूर ग्रुप - अ कृष्णकुमार गोयल एंटरप्राईज’, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ आणि ‘हिंदमाता प्रतिष्ठान महिला समूह संघटक’ हे सहयोगी प्रायोजक होते..‘सोनी मराठी’ वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या कार्यक्रमाच्या महाअंतिम फेरीत प्रवेश केलेल्या अव्वल पाच कीर्तनकारांनी कीर्तनसेवा अर्पण केली. त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा आणि संत कान्होबा या पाच संतांची चरित्रे उलगडली आणि प्रत्येक संतांच्या एका अभंगावर निरूपण केले.सोमनाथ महाराज पाटील यांनी ‘पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसी’, प्रमोद महाराज डुकरे यांनी ‘नामबळे देही असोनिया मुक्त’, कल्याणी महाराज मोरे यांनी ‘झाडलोट करी जनी। केर भरी चक्रपाणि।।’, लक्ष्मण महाराज लटपटे यांनी ‘नको देवराया अंत आता पाहू’ आणि हर्षद महाराज भागवत ‘भुक्ती मुक्ती तुझी’ या अभंगाचे निरूपण केले. अविनाश महाराज आणि आदेश महाराज यांनी पंचपदी सादर केली. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले..याप्रसंगी कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, हिंदमाता प्रतिष्ठान महिला समूह संघटनेच्या महिला संघटक प्रतिभा धंगेकर, सर्किट हाऊस क्रिएशन्स’चे प्रतीक कोल्हे आदी उपस्थित होते.पुणेकरांनी केला हरिनामाचा गजरया कीर्तन महोत्सवावेळी सभागृहात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक कीर्तनाच्या प्रारंभी आणि अखेरीस हरिनामाचा गजर होत होता. त्यावेळी उपस्थित पुणेकरही उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते. ‘विठ्ठल विठ्ठल’ अशा नामघोषाने सभागृह दुमदुमले होते..साहित्यात कवितेचे जसे महत्त्व आहे, तसे भक्तीत भावाचे महत्त्व आहे. भक्ती ही देवाच्या प्राप्तीचे साधन आहे, पण त्या भक्तीत भाव असणे गरजेचे आहे. संत जनाबाई यांचा संत परंपरेतील अधिकार फार मोठा होता.- कल्याणी महाराज मोरेसामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी त्यांना आलेले पारमार्थिक अनुभव शब्दबद्ध केले. संत ज्ञानेश्वर यांना समाजाने खूप त्रास दिला, पण समाजाचे वाटोळे व्हावे, असा विचार त्यांनी कधीही केला नाही. हेच संतांचे मोठेपण असते.- सोमनाथ महाराज पाटील.संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत चांगदेव अशा तीन देवांना जागृत करण्याचे काम संत मुक्ताबाई यांनी केले. नामस्मरणाचा अधिकार फक्त माणसाला दिला आहे. त्यामुळे आधी चांगले माणूस व्हा, मग नामस्मरण करा.- प्रमोद महाराज डुकरेअनेक वर्षांपूर्वीच पुरुषांसह स्त्रियांनाही समान अधिकार देणारा वारकरी संप्रदाय हा जगातील एकमेव संप्रदाय आहे. संत स्त्रियांनी सोप्या शब्दांमधून तत्त्वज्ञान मांडले आहे. संत कान्होपात्रा या परंपरेतील अशाच एक महत्त्वाच्या संत आहेत.- लक्ष्मण महाराज लटपटेसंत कान्होबा यांच्या ‘भुक्ती मुक्ती तुझी’ या अभंगातून भावाविषयी त्यांच्या अंतःकरणात असलेले प्रेम प्रकट होते. भक्ताला भगवंताशी भांडण्याचा अधिकार नक्कीच आहे, पण ज्याचे नाणे खणखणीत आहे, तोच भगवंताशी भांडू शकतो.- हर्षद महाराज भागवत.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.