छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्काराने प्रा. डॉ. किसन माने यांचा गौरव

छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्काराने प्रा. डॉ. किसन माने यांचा गौरव

Published on

SGW26B09383
सोलापूर : छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्कार प्रा. डॉ. किसन माने यांना प्रदान करताना कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि ज्येष्ठ साहित्यिक सीताराम सावंत व इतर मान्यवर.

प्रा. किसन माने यांना पुरस्काराने सन्मान
.........
सांगोला, ता. २८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भाषा वाङ्मय संकुल आणि मराठी विभागाच्या वतीने शिक्षक गटातून दिला जाणारा छत्रपती शंभुराजे साहित्य पुरस्काराने सांगोल्याचे प्रा. डॉ. किसन माने यांचा गौरव करण्यात आला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि ज्येष्ठ साहित्यिक सीताराम सावंत यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सी. ए. महादेव खराडे, भाषा संकुल प्रमुख डॉ. अंजना लावंड, डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. नानासाहेब गव्हाणे, डॉ. शिवाजी शिंदे तसेच विविध प्राधिकरणांचे प्रमुख उपस्थित होते. प्रा. डॉ.माने लिखित जलनीतीचे अंतरंग हा ग्रंथ पाणी समस्येवर विविध काळात कार्य केलेल्या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा, समस्यांचा आणि उपाययोजनांचा सखोल लेखाजोखा मांडतो. पाणी ही काल, आज आणि उद्याही सर्व सजीवांची अत्यावश्यक गरज आहे, याची जाणीव ठेवून हा ग्रंथ सिद्ध करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com