

किसन वीर कामगार आंदोलनाची
चर्चा दुसऱ्या दिवशीही अनिर्णित
भुईंज, ता. ६ : येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यात थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधींची दुसऱ्या दिवशीही दिवसभर चर्चा सुरू होती. मात्र, सायंकाळपर्यंत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा प्रश्न कायम राहिला.
कारखाना कार्यस्थळावर कालपासून कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. आज दुपारी १२ पासून कामगारांचे शिष्टमंडळ आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेला सुरुवात झाली. यावेळी कामगारांनी सप्टेंबर महिन्याच्या वेतनात दहा टक्के वाढ करण्यासह पाच पगार देण्याची मागणी केली. मात्र, कारखाना सध्या आर्थिक अडचणीत असल्याने एवढ्या मागण्या तातडीने पूर्ण करणे शक्य नसल्याचे व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. त्याचबरोबर रक्कम जुळविण्यासाठी वेळ लागणार असून, सायंकाळपर्यंत कामगारांच्या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय देण्याचे आश्वासन देण्यात आले. सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्याने कामगारांचे शिष्टमंडळ उद्या सकाळी पुन्हा चर्चेसाठी येणार असल्याचे सांगून कारखाना कार्यस्थळावरून निघून गेले. दरम्यान, किसन वीर कारखान्याच्या गळीत हंगामाचा गव्हाणपूजन व मोळी टाकण्याचा कार्यक्रम आजच असल्याने त्यापूर्वी कामगारांच्या आंदोलनावर तोडगा निघणार का, याकडे कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी व कामगारांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.