किशोरवयीन पिढीला सुदृढ करण्यासाठी किशोरी मेळावा प्रेरणादायी उपक्रम
MHD26B04931
एखतपूर (ता. सांगोला) : येथे झालेल्या तालुकास्तरीय किशोरी हितगूज मेळाव्याचे उद्घाटन करताना माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील व डॉ. निकिता देशमुख.
............
किशोरवयीन पिढीच्या सुदृढतेसाठी किशोरी मेळावा प्रेरणादायी
...........
दीपक साळुंखे; एखतपूर केंद्र शाळेत तालुकास्तरीय किशोरी हितगूज मेळावा
..........
महूद, ता. ५ : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा जपत, आपल्या किशोरवयीन पिढीला सुदृढ, सुसंस्कृत व सुशिक्षित करण्यासाठी हा किशोरी हितगूज मेळावा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे, असे विचार विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी एखतपूर येथे बोलताना व्यक्त केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सांगोला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने एखतपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत तालुकास्तरीय किशोरी हितगूज मेळावा नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील व डॉ. निकिता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेतील विद्यार्थिनी सानवी उबाळे होती.
यावेळी डॉ. निकिता देशमुख यांनी मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवात सांस्कृतिक कला मंच सांगोला यांच्या सुमधुर गीत गायनाने झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठोंबरेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर अशी गीते व लेझीम नृत्य सादर केले. डॉ. श्रुती लवटे यांनी मुलींना आरोग्य विषयक सल्ले दिले. ॲड. शिरदाळे यांनीही मुलींना मार्गदर्शन केले. मुलींच्या चित्रकला, लोकनृत्य, एकपात्री नाट्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. यशस्वी मुलींना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, शिक्षण विस्ताराधिकारी लक्ष्मीकांत कुमठेकर, सरपंच वर्षा जाधव, उपसरपंच सुरेश नवले, ग्रामसेवक शंकर मेटकरी, केंद्रप्रमुख सुखदेव लवटे, केंद्रीय मुख्याध्यापक हनुमंत जाधव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण विस्ताराधिकारी अमोल भंडारी यांनी केले. सूत्रसंचालन वंदना पाटणे, मोहन आवताडे, संतोष कांबळे यांनी केले. तर डी. जे. इंगोले यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

