Pune Rains : पुणेकरांनो, जाणून घ्या पावसाचा जोर कधी होणार कमी? (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

Pune Rains : पुणे : शहर आणि जिल्ह्यात पुढील चोवीस तास रात्रीच्या वेळेस पावसाचा जोर कायम असणार आहे. पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र आणि अरबी समुद्रात बनलेली चक्रीवादळाची स्थिती कायम आहे. वाढत्या तापमानामुळे स्थानिक हवामान बदलातून मध्यम आणि तीव्र पावसाच्या सरी बसणार असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.अनुपम काश्‍यपि यांनी सांगितले आहे.

डॉ.काश्‍यपि म्हणाले,"काल रात्री पुण्यात झालेला पाऊस हा धगफुटीचा प्रकार नव्हता. काही तासात झालेला तीव्र स्वरूपाचा पाऊस आणि उथळ झालेल्या ओढ्याचे अथवा नदी प्रवाहांचे पात्र यामुळे हा प्रकार घडला.'' उदयानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्‍यता आहे. परंतु चक्रीवादळाची स्थिती कायम राहील असे डॉ. कश्‍यप म्हणाले. मान्सूनचा परतीचा प्रवास लांबल्याने अशा प्रकारच्या पावसात वाढ झाली आहे. 

ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतणार मॉन्सून 
मॉन्सूनचे आगमन देशात उशिराने झाले. तसेच त्याचा परतीचा प्रवासही लांबला आहे. ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मॉन्सून परतीचा प्रवास सुरू करेल असे हवामान विभागाने सांगितले आहे. लांबलेला मॉन्सून आणि तापमानात झालेली वाढ स्थानिक स्तरावरील तीव्र स्वरूपाच्या पावसाला कारणीभूत आहे. पुढील काही दिवस जवळ-जवळ संपूर्ण देशात अशी स्थिती कायम राहील.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know when the Pune rains will be decreased