MPSC Success : कोकडेवाडीच्या शेतकरी पुत्राचा पराक्रम: संजय शितोळे यांची MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड

ग्रामीण शेतकरी कुटुंबातील संजय शितोळे यांची जिद्द, सातत्य आणि स्वअभ्यासाच्या जोरावर MPSC दुय्यम निबंधक पदावर निवड; कोकडेवाडी-न्हावरे परिसरात अभिनंदनाचा वर्षाव
Sanjay Baban Shitole from Kokadewadi in Shirur taluka, Pune district, has been selected as a Secondary Registrar (Registration) through the MPSC 2025 examination.

Sanjay Baban Shitole from Kokadewadi in Shirur taluka, Pune district, has been selected as a Secondary Registrar (Registration) through the MPSC 2025 examination.

Sakal

Updated on

न्हावरे : जिद्य व चिकाटीच्या जोरावर कोकडेवाडी (ता. शिरूर) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील संजय बबन शितोळे यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांची दुय्यम निबंधक (नोंदणी) या पदावर निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर मिळविलेल्या या यशामुळे कोकडेवाडी, न्हावरे सह परिसरात शितोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com