कोकिलाबेन रुग्णालयाचे दोन विभाग जागतिक यादीत

कोकिलाबेन रुग्णालयाचे 
दोन विभाग जागतिक यादीत
Published on: 

पुणे, ता. २१ : कर्करोग उपचार आणि स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्रातील उत्कृष्ट सेवांसाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाचा न्यूजविक आणि ‘स्टॅटिस्टा’ या संस्थांच्या ‘वर्ल्ड्स बेस्ट स्पेशलाइज्ड हॉस्पिटल्स २०२७’ या जागतिक यादीत समावेश झाला आहे. या मानांकनामुळे रुग्णालयाच्या दोन्ही विभागांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली असल्याचे रुग्णालयाने सांगितले.
या क्रमवारीत १३ वैद्यकीय क्षेत्रांतील रुग्णालयांचा समावेश केला जातो. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, उपचारांचा दर्जा आणि रुग्णसेवा या निकषांवर ही क्रमवारी निश्चित केली जाते. रुग्णालयाच्या कर्करोग उपचार केंद्रात वैद्यकीय, शस्त्रक्रिया आणि रेडिएशन ऑन्कोलॉजीसह केमोथेरपी, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि रोबोटिक शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध आहे. रुग्णांच्या गरजेनुसार विविध वैद्यकीय तज्ज्ञांच्या सहकार्याने उपचारांचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर रुग्णालयाने गेल्या वर्षी देशातील पहिली ‘आंतरखंडीय रोबोटिक शस्त्रक्रिया’ यशस्वी केली असल्याचेही रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले.

स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागात उच्च जोखमीच्या गर्भधारणेचे व्यवस्थापन, गर्भावस्थेतील प्रगत निदान, एंडोमेट्रिओसिसवरील उपचार आणि रोबोटिक शस्त्रक्रिया अशा सुविधा आहेत. तसेच, रुग्णालयातील एंडोमेट्रिओसिस क्लिनिकला ‘युरोपियन एंडोमेट्रिओसिस लीग’च्या ‘युरोएंडोसर्ट’ कार्यक्रमांतर्गत प्रमाणपत्र मिळाले आहे.
रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संतोष शेट्टी म्हणाले, ‘‘रुग्णालयाच्या या दोन विभागांचा जागतिक यादीत समावेश होणे हे आमच्या वैद्यकीय पथकाचे कौशल्य, प्रगत तंत्रज्ञान आणि रुग्णकेंद्रित उपचारपद्धतीचे फलित आहे. रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com