रस्त्याची दुरावस्था! कोळा-शेटफळ मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; काटेरी झाडांमुळे अपघाताची भीती

रस्त्याची दुरावस्था! कोळा-शेटफळ मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; काटेरी झाडांमुळे अपघाताची भीती
Published on

PNE26W40529
कोळा (ता. सांगोला) : कोळा-शेटफळ या मुख्य रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुरवस्था.
---
कोळा-शेटफळ रस्ता खड्डेमय
डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत तीन किलोमीटरचा रस्ता
सकाळ वृत्तसेवा
कोळा, ता. ६ : सांगोला तालुक्यातील कोळा- शेटफळ मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, खड्डे आणि रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडांमुळे वाहनधारकांसह शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तातडीने डांबरीकरणाची मागणी केली आहे.
कोळा गावापासून सुमारे एक किलोमीटरपर्यंत डांबरीकरण झाले असले, तरी देखभालीअभावी त्या भागातही मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर कै. बाबासाहेब देशमुख यांच्या घरापासून जिल्हा हद्दीपर्यंतचा सुमारे तीन किलोमीटरचा रस्ता अद्याप डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक ग्रामस्थ व वाहनधारकांनी रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करून दोन्ही बाजूंची काटेरी झाडे हटवावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
---
रात्रीच्या वेळी प्रवास धोकादायक
रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांची ये-जा होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
---
कोट
PNE26W40535
या रस्त्यावरून प्रवास करताना हा रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता, हेच समजत नाही. त्यामुळे हा मार्ग जिल्हा हद्दीपर्यंत पूर्णपणे डांबरीकरण करावा.
- हणमंत सरगर, सामाजिक कार्यकर्ते, कोळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Villagers staged a protest demanding immediate repairs to the Kanersar–Pur–Pabal road after repeated accidents, including a fatal crash, highlighting the urgent need for safer roads.
Khelna Medium Irrigation Project bund overgrown with thorny bushes farmers demand immediate cleaning in Sillod
Pune
Hingoli
Marathi News Esakal
www.esakal.com