

कोल्हापुरात खत कारखान्यात
मिश्र खतांचे द्वितीय उत्पादन सत्र सुरू
----
कोल्हापूर : महामंडळाच्या येथील खत कारखान्यात कृषी उद्योग मिश्र खतांचे द्वितीय उत्पादन सत्र सुरू करण्यात आले. येथील मिश्र खत कारखान्यामध्ये उत्पादित होणारे मिश्र खत मुख्यतः कृषी-उद्योग १८:१८:१० चा पुरवठा कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच धाराशिव व पुणे या जिल्ह्यांमध्ये केला जातो. कृषी उद्योग मिश्र खतांना शेतकऱ्यांची पसंती असून बाजारात इतर खतांच्या किंमती वाढल्याने कृषी उद्योग मिश्र खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
सद्यःस्थितीत महामंडळाच्या खत कारखाना, कोल्हापूर येथे १८:१८:१० मिश्र खताचे एका सत्रामध्ये उत्पादन सुरू असून, प्रतिदिन सुमारे ४० टन उत्पादन होत आहे. कारखान्याच्या मंजूर उत्पादन क्षमतेनुसार वार्षिक क्षमता १६००० टन आहे. त्यामुळे खरीप व येणाऱ्या रब्बी हंगामातील वाढती मागणी तसेच शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खताचा सुरळीत पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उपलब्ध यंत्रसामग्री व उत्पादन क्षमतेचा अधिकाधिक वापर करत द्वितीय उत्पादन सत्राच्या प्रारंभ कृषिमंत्री आणि अध्यक्ष महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळ दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतीने झाला.
या प्रसंगी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे तसेच महामंडळाचे सर्व विभागीय व्यवस्थापक, कारखाना व्यवस्थापक, मुख्य कार्यालयातील संबंधित अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. द्वितीय सत्र सुरू केल्याने प्रति दिन ४० टन खताचे अधिकचे उत्पादन होणार आहे व कारखान्याच्या वार्षिक उत्पादन क्षमतेएवढे उत्पादन घेणे शक्य होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.