कोल्हापूर:सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर:सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
Published on: 

कोल्हापूर जिल्ह्याकरिता
रब्बी पीकविमा योजना लागू

ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग पिकांचा समावेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
कोल्हापूर : रब्बी हंगाम २०२६-२७ साठी जिल्ह्यात सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात रब्बी ज्वारी (जिरायत), गहू (बागायत), हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांचा समावेश करण्यात आला आहे.

पीकविमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदार शेतकऱ्यांसह कुळाने अथवा भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरीही योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. योजनेतील अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे.

--- चौकट ---
योजनेत सहभागासाठी मुदत
पीक--- मुदत
रब्बी ज्वारी : ३० नोव्हेंबर २०२६
गहू, हरभरा : १५ डिसेंबर २०२६
उन्हाळी भुईमुग : ३१ मार्च २०२७
------चौकट-------
विविध आपत्तींत संरक्षण
या योजनेतून पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांच्या उत्पादनावर होणाऱ्या परिणामांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे.
---------------
योजना राबवण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग अथवा तांत्रिक उत्पादनाच्या आधारे महसूल मंडळातील पिकांच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत प्रत्यक्ष उत्पादनात घट आढळल्यास नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

पीक नुकसानीची जोखीम पीकविम्याच्या माध्यमातून कमी करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यास ही योजना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.