esakal | कोलते पाटील डेव्हलपर्स बांधणार १५ हजार घरे
sakal

बोलून बातमी शोधा

Kolte Patil

कोलते पाटील डेव्हलपर्स बांधणार १५ हजार घरे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड (Kolte Patil Developers Ltd) पुण्यानंतर आता मुंबई, (Mumbai) बंगळूरमध्येही (Bengluru) विस्तार करीत आहे. किफायतशीर घरांसाठी, (Home) जगात नावाजलेले ‘प्लॅनेट स्मार्ट सिटी’ आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांच्या सहनिर्मितीतून १५ हजार घरांच्या (Home) निर्मितीची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. (Kolte Patil Developers to Build 15000 Houses)

प्लॅनेट स्मार्ट सिटी आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांच्या सहनिर्मितीचा पहिलाच भव्य प्रकल्प असून युनिव्हर्स, सेक्टर आर १०, लाइफ रिपब्लिकच्या भरघोस यशानंतर हे महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

हेही वाचा: पाय घसरून विहिरीत पडले आजोबा, अग्निशमन दलानं वाचवले प्राण

कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे ग्रुप सीईओ यशवर्धन पाटील म्हणाले, ‘‘आम्ही जागतिक किफायतशीर आणि स्मार्ट ख्यातनाम ‘प्लॅनेट स्मार्ट सिटी’सह सर्वांना किफायतशीर घरे बांधून विश्वसनीय भागीदारीतून प्रगती करण्यास उत्सुक आहोत. कोलते-पाटील हा ब्रँड सातत्याने बांधकाम व्यवसायात ग्राहकांच्या फायद्यासाठी नवनवे प्रयोग करीत असतो. त्यामुळे पुणे, मुंबई व बंगळूर येथे लक्ष्य असलेल्या बाजारपेठेत अपेक्षित यश मिळविणे आम्हाला सोपे जाणार आहे.’’

‘प्लॅनेट स्मार्ट सिटी’चे ग्लोबल सीईओ जिओवन्नी साविओ म्हणाले, ‘भारतात उद्योग क्षेत्रासाठी अतुलनीय क्षमता आहेत. भारतातील रिअल इस्टेट विकास क्षेत्रात कोलते पाटील डेव्हलपर्स लि. हे नाव दमदारपणे नेतृत्व करत आहे. यांच्यासोबत भागीदारी करून आम्ही १५ हजार घरे निर्माण करण्याचे ध्येय गाठणार आहे. शहरी राहणीमान उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधाराने नव्या संकल्पना राबविणार आहोत. यामुळे इएसजी फ्रेमवर्क गृहनिर्माण आव्हानावर हे एक उत्तर असेल. कोलते - पाटील डेव्हलपर्ससह भविष्यात व्यावसायिक नाते अधिक दृढ करण्यावर आमचा भर राहील.’’

loading image