ओतूर : जुन्नर तालुक्यातील कोळवाडी येथे पिंपळगाव जोगा धरणाच्या तीरावर असलेल्या अंदाजे ३५ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी झाल्याची घटना रविवारी सकाळी उघड झाली आहे. .अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटेच्या सुमारास कोळवाडी गावच्या हद्दीत पिंपळगाव जोगा धरणाच्या जलाशयाच्या तीरावर अंदाजे ३५ शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज पुरवठा करणाऱ्या केबल कापून तेथेच साळून त्या मधुन धातूची तारा काढून नेल्या असल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे अंदाजे ६ ते ७ लाख रुपया पर्यंत आर्थिक नुकसान झाले आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली असून पिकांना, जनावरांना व स्वताच्या घरी असलेला पाणी पुरवठा पुर्ण पणे ठप्प झाला आहे . त्यामुळे लगेच नविन केबल खरेदी करुन पिकांना पाणीपुरवठा केला नाही तर या उन्हाळ्यात पिके हातची वाया जाणार आहे.त्यामुळे अचानक उद्भवलेल्या या आर्थिक भुर्दंडामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे..कोळवाडी व परीसरात केरू कुमकर,बाजीराव दिघे, कुंडलिक दिघे, सोहजाबाई मोरे, सुमन फोडसे, हेमलता कुमकर, ज्ञानेश्वर कुमकर, ज्ञानेश्वर कुमकर, शंकर कुमकर, बबन कुमकर, मच्छिंद्र कुमकर, खंडु कुमकर, बाबाजी कुमकर, भास्कर कुमकर, विठ्ठल कुमकर, रविंद्र कुमकर, मारूती कुमकर, नामदेव कुमकर, दत्तात्रय कुमकर, मारूती कुमकर, विश्वास कुमकर, निवृत्ती कुमकर, महादेव कुमकर, जयदास कुमकर, सिताराम कुमकर, खंडु कुमकर, विठ्ठल कुमकर, कैलास पानसरे, अक्षय कुमकर, बबन कुमकर, तुकराम कुमकर, भास्कर कुमकर व इतर शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली आहे..याबाबत ओतूर पोलिसात सर्व शेतकऱ्यांच्या वतीने केरू कुमकर यांनी अज्ञात चोरट्यां विरोधात ४ लाख ९५ हजार ५०० रुपयाची ९ हजार ९१० फुट अपोलो कंपनीच्या तांब्याच्या तारा असलेल्या केबल वायर चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.ओतूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून सदर चोरीच्या घटनेचा पंचनामा केला आहे..सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब कुमकर म्हाणाले कि आधी शुक्रवारी मढ व पारगाव परीसरात शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली आणि रविवारी सकाळी कोळवाडी व परिसरातील शेतकऱ्यांची केबल चोरी होऊन ६ ते ७ लाखांचा शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.या दोन चोरीच्या घटनांवरून पिंपळगाव जोगा, डिंगोरे व उदापूर या परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क होणे गरजेचे आहे.तसेच पोलिसांनी ही केबल चोराचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलून चोरटे जेरबंद करावे,अन्यथा शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक होईल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.