कोंडाणा उंदीर आता चार किल्ल्यांवर

Rat
Rat

पुणे - तुम्हाला कदाचित माहीत असेल, की सिंहगडावर कोंडाणा नावाचा उंदीर आढळतो. केवळ याच ठिकाणी त्याचा अधिवास असल्याचे २००८ मध्ये संशोधन झाले होते. मात्र, हा उंदीर केवळ सिंहगडच नव्हे तर राजगड, तोरणा आणि रायरेश्‍वराच्या घाटमाथ्यावरही आढळला आहे. नागरीकरण, झपाट्याने कमी होणारे गवत, आग लागण्याच्या घटना आणि पर्यटनामुळे ही प्रजाती अतिसंकटग्रस्त झाली असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

सिंहगडावर सापडणारा हा उंदीर पोटाकडील भागावर असणाऱ्या पांढऱ्या फरमुळे वेगळा आहे. त्याचे वास्तव्य हे केवळ सिंहगडावरच असल्याचे पुरावे होते. मात्र, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या समीर बजरू, अमोल कुळवमोडे आणि रणजित मनकदन या तीन संशोधकांनी त्यावर अधिक अभ्यास केला. २०११ ते १३ च्या काळात केलेल्या संशोधनानुसार ही प्रजाती केवळ बाराशे मीटर व त्यापेक्षा जास्त उंचीवरील गवताळ प्रदेशात आढळते. उत्तर पश्‍चिम घाटात अशी ठिकाणे मर्यादित असल्याने सिंहगड, तोरणा, रायरेश्‍वर आणि राजगडावर या उंदरांचे वास्तव्य आढळले. सस्तन प्राण्यांमध्ये प्रदेशानिष्ठ आढळणारी ही एकमेव प्रजाती असल्याचे संशोधन या तिघांनी केले. 

हा वेगळा असलेला उंदीर याच भागात कसा आढळतो, असा प्रश्‍न नक्कीच पडला असेल. त्याचे मुख्य कारण म्हणजे प्रदेशाची उंची आणि त्यांची प्रजननक्षमता. या उंदरांचा प्रजननकाळ हा केवळ पावसाळा असून, एक मादी केवळ चार ते सहा पिलांनाच जन्म देते. दुसरे प्रमुख कारण पश्‍चिम घाटात आढळणारे खाद्य हे केवळ पावसाळ्यातच आढळत असल्याने हाच प्रजननाचा उत्तम काळ असल्याचे आढळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com