कास - कोंडवे केंद्राचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न...

कास - कोंडवे केंद्राचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न...
Published on

कोंडवे केंद्राचा बालआनंद मेळावा उत्साहात
विविध कलागुणांचे दर्शन
किडगाव, ता. १२ ः कोंडवे केंद्राचा बालआनंद  मेळावा  राधाकृष्ण मंगल कार्यालय नुने येथे मोठ्या उत्साहात झाला.
जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव सावंत, पंचायत समिती सदस्य महेश गाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गायकवाड, प्रतिभा पवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र चोरगे, केंद्रप्रमुख सुनंदा पवार, केंद्रसंचालक सविता बारंगळे, शौकत सय्यद यांच्या उपस्थितीत उद्‍घाटन झाले.
शाहूपुरी, ठोंबरेवाडी, सैदापूर, हमदाबाज, हिरापूर, नुने (बेबलेवाडी), नुने गावठाण, धनवडेवाडी, कोंडवे, गवडी, सारखळ, दरे बुद्रुक या शाळा बालआनंद मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. बालचमूंनी उत्कृष्ट प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार करून प्रशस्तिपत्रक, तसेच शाळेस सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल माजी केंद्रप्रमुख छाया कदम, धनवडेवाडी शाळेच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका सविता बारंगळे, जिल्हास्तरावर स्काऊट गाइड स्पर्धेत प्रथम क्रमांक केंद्रशाळा कोंडवे येथील कॅप्टन कांचन सावंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात सहभागी नुने गावठाण येथील माधवी कांबळे, शिक्षक कर्मचारी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सारखळ येथील प्राजक्ता सुपेकर, सैनिक स्कूलमध्ये निवड झाल्याने कोंडवे शाळेतील वैष्णवी दुदुस्कर, रूद्र भुजबळ आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. उपशिक्षक संदीप बाबर, बळवंत सपकाळ, राजेंद्र इंगवले, अजितकुमार फडतरे, जगदीश बुधावले, वैभव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. गटशिक्षणाधिकारी जयश्री शिंगाडे यांनी सर्वांचे कौतुक केले.


04704
नुने ः कलाविष्कार सादर करताना बाल कलाकार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com