Land Acquisition: राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी कोंढापुरी ग्रामस्थांचे खासदारांना साकडे

Kondhapuri Land Acquisition: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन करताना योग्य मोबदला द्यावा, कोंढापुरी येथे उड्डाणपूल उभारावा आणि प्रस्तावित टोलनाका रद्द करावा, अशी ग्रामस्थांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे मागणी केली.
Kondhapuri villagers submit a memorandum to Shirur MP Dr Amol Kolhe over land acquisition and other demands related to the Pune-Ahilyanagar National Highway.

Kondhapuri villagers submit a memorandum to Shirur MP Dr Amol Kolhe over land acquisition and other demands related to the Pune-Ahilyanagar National Highway.

esakal

Updated on: 

नागनाथ शिंगाडे : तळेगाव ढमढेरे, ता.२२: कोंढापुरी (ता.शिरूर) येथे पुणे- अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यात यावा तसेच कोंढापुरी चौकात होणारा टोल नाका रद्द करावा आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूचे भूसंपादन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचा योग्य मोबदला द्यावा आदी प्रमुख मागण्यासाठी ग्रामस्थांनी शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना निवेदन देऊन साकडे घातले आहे. तीनही प्रमुख मागण्यावर ग्रामस्थांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या समवेत निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी माजी सरपंच स्वप्निल गायकवाड, कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, उपाध्यक्ष विनय गायकवाड, उद्योजक भास्कर गायकवाड, वैभव गायकवाड, संदीप लवांडे, सुधीर गायकवाड, सुरेश गोगावले आदी प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.

Loading content, please wait...