

कोंढवली पाणीपुरवठा योजनेसाठी ८५ लाख
अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता
सातारा, ता. ३० ः धोम प्रकल्पांतर्गत कोंढवली (लिंब) या पुनर्वसित गावठाणातील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ८४ लाख ९३ हजार २८२ रुपयांच्या अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
कोंढवली या पुनर्वसित गावठाणातील नळ पाणीपुरवठा योजना या नागरी सुविधा कामाच्या २४.८५ लाख एवढ्या अंदाजपत्रकास पुणे विभागीय आयुक्त यांनी प्रशासकीय मान्यता देऊन हा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, या निधीमधून सदर योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या उद्भवास पाणी कमी पडत असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या कामासाठी सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्री भोसले व मंत्री पाटील यांच्याकडे केली होती.
त्यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता यांनी प्रस्ताव विभागीय आयुक्त (पुणे) यांच्याकडे सादर केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने कोंढवली लिंब येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या ८४ लाख ९३ हजार २८२ रुपयांच्या अंदाजपत्रकास विशेप बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे भरीव निधी उपलब्ध झाला असून, कोंढवली येथील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. याबद्दल कोंढवली ग्रामस्थांनी मंत्री भोसले व मंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत.
-----------------------
01986
सातारा ः मकरंद पाटील यांचे अभिनंदन करताना कोंढवली ग्रामस्थ.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.