
कोंढवा, ता. १९ : लातूरवरुन मामाकडे सुटीला आलेल्या मुलाचा कोंढव्यात अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १८) घडली आहे. भरधाव मोटारीच्या धडकेत त्याचा जागीच मॄत्यू झाला. कोंढवा गावठाणातील अरुंद व गजबलेल्या ठिकाणी गाडी भरधाव चालविणाऱ्या चालकाला व त्याच्या चार साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, तीनजण पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.