पुणे - कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहत असलेल्या संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणात कोंढवा पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली आहे. आरोपीला अटक करण्यात येणार नाही..मात्र त्याने तपासात सहकार्य करावे, पोलिसांनी बोलाविल्यानंतर पोलिस ठाण्यात हजर होण्यासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.आरोपी कुरिअर बॉय नसून आयटी अभियंता असल्याचे पुढे आले होते. सुरुवातीला तरुणीने त्याला आपण ओळख नाही असे सांगितले होते. परंतु पोलिसांनी तिच्यासमोर तरुणाच्या ओळखीचे पुरावे दिल्यानंतर तिने आपण त्याला ओळख असल्याचे कबूल केले. तक्रारीत तिच्या चेहऱ्यावर आरोपीने स्प्रे फवारून तिला बेशुद्ध केले, त्यानंतर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते..मात्र, पोलिस तपासात आरोपीने स्प्रे वापरल्याचा पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी शहरातील पाचशेहून अधिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. आरोपीचा चेहरा सोसायटीमधील सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत होता.पोलिसांनी सोसायटीतील सर्व ४४ सदनिकाधारकांकडे चौकशी केली. परंतु त्यांनी सोसायटीत आलेल्या तरुणाला ओळखत नसल्याचे सांगितले. तरुणीनेही त्याला सुरुवातीला ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे तपास करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले..आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तरुणी आणि त्याची समोरासमोर चौकशी केली. या सर्व प्रकाराची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. कायद्यानुसार या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक न करता त्याला, पुण्याबाहेर जायचे नाही, पोलिसांनी बोलाविल्यानंतर पोलिस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात नोटीस दिली. तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर आरोपीची सुटका करण्यात आली आहे..पोलिसांना दिलेली काही माहिती खोटी - तरुणीमी सांगितलेल्या काही गोष्टी खोट्या असल्या, तरी त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असा जबाब दिला आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.