Pune Crime File PhotoSakal
पुणे
Pune Crime : कोंढव्यात शस्त्राच्या धाकाने तरुणाला लुटले; मोबाईल, दागिने आणि रोख रक्कम लंपास
Kondhwa Robbery : कोंढवा परिसरात रात्री पादचारी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून मोबाईल, चांदीचे दागिने व यूपीआयद्वारे दहा हजार रुपये लुटल्याची घटना घडली.
पुणे : कोंढवा परिसरात रात्रीच्या सुमारास पादचारी तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी मोबाईल, चांदीचे दागिने तसेच ऑनलाइन पद्धतीने दहा हजार रुपये लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

