
कोंढवा : कोंढवा आणि येवलेवाडी भागातील वाढती लोकसंख्या, नागरिकांच्या वीजविषयक वाढत्या तक्रारी आणि प्रशासकीय सोयीसाठी स्वतंत्र वीज कार्यालयाची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. ऊर्जा विभागाकडून कोंढवा शाखेचे विभाजन करून कोंढवा आणि येवलेवाडी अशी दोन स्वतंत्र वीज कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.