Road Flooded: कोंढवे-धावडेतील पावसात रस्ता तळे बनला; कचरा व्यवस्थापन व जलनिस्सारणातील त्रुटींमुळे दीड तास वाहतूक ठप्प

कोंढवे-धावडेतील वारंवार पाणी साचण्याने वाहतूक ठप्प, नागरिक त्रस्त; कचरा व्यवस्थापन व रस्ते नियोजनातील त्रुटी उघड
Infrastructure Failure: The Drainage and Waste Management Nexus

Infrastructure Failure: The Drainage and Waste Management Nexus

Sakal

Updated on

शिवणे : रविवारी सायंकाळी झालेल्या पावसाने कोंढवे-धावडे येथील वारजे-बहुली-मुठा रस्त्यावरील कचरा व्यवस्थापन आणि रस्ते नियोजनातील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्या. रस्त्यावर साचलेल्या पाण्याने अक्षरशः तळ्याचे रूप धारण केल्याने सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रभावी व्यवस्था नसल्याने परिसराचा संपर्क तुटला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com