<slug- कोंडवे - कोंडवे सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल निंबाळकर यांची बिनविरोध निवड /slug> व्हाईस चेअरमनपदी भरत चोरगे यांची वर्णी
कोंडवे सेवा सोसायटीच्या
अध्यक्षपदी अनिल निंबाळकर
उपाध्यक्षपदी भरत चोरगे; एकमताने निवडी
कोंडवे, ता. १४ ः येथील विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलिस अधिकारी अनिल शंकरराव निंबाळकर, तर उपाध्यक्षपदी भरत शंकर चोरगे यांची नुकतीच एकमताने निवड झाली. स्वरूप बरिदे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
बाळासाहेब चोरगे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सोसायटीचे सभासद व शेतकरी उपस्थित होते. या निवडीप्रसंगी माजी अध्यक्ष प्रमोद गाडे, अंकुश बोडके, संचालक रवींद्र चोरगे, दिलीप दीक्षित, नितीन चोरगे, बाबूराव गाडे, प्रल्हाद गुजर, शोभा निंबाळकर, अनिता भिलारे, युवा नेते विक्रम ननावरे, नंदकुमार गाडे, प्रशांत चोरगे, सचिव रणजित जाधव, किरण गाडे, तानाजी चोरगे, राजू गाडे, नीलेश वारागडे, विकास अधिकारी श्री. शिर्के आदी उपस्थित होते.
खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी सभापती सुनील काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता चोरगे, संदीप शिंदे, बाळासाहेब ननावरे, अंकुश चोरगे, सुभाष चोरगे, राजेंद्र चोरगे, अनिल वीर, अधिकराव निंबाळकर, जयवंत गाडे, चंद्रकांत निंबाळकर आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
A00274
कोंडवे ः अनिल निंबाळकर व भरत चोरगे यांचा सत्कार करताना बाळासाहेब चोरगे, प्रमोद गाडे, अंकुश बोडके. (किरण गाडे ः सकाळ छायाचित्रसेवा)
....................................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

