कोपर्डे हवेली : अपक्ष उमेदवारांचा गावभेटीचा धडाका...
प्रचार सांगतेनिमित्त
गावभेटीचा धडाका
रामकृष्ण वेताळांच्या मार्गदर्शनात मोहीम
कोपर्डे हवेली, ता. ५ : जिल्हा परिषद गटातील अपक्ष उमेदवार विद्या रामकृष्ण वेताळ, कोपर्डे हवेली पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार अमित पाटील आणि वाघेरी पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार नीलम पिसाळ यांनी रामकृष्ण वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचाराच्या सांगतेनिमित्त गावभेटीचा धडाका उडवून दिला.
वडोली, शामगाव, कामथी, शिरवडे, कोपर्डे यासह इतर अनेक गावांमध्ये या उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या हारांनी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांचे भव्य स्वागत केले. नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, “आम्ही तळागाळातील लोकांमध्ये मिसळून काम केले आहे. गोरगरिबांच्या समस्या सोडवल्या आणि गावोगावी विकासकामे केली आहेत. त्यामुळे जनता जनार्दन आमच्या उमेदवारांना निवडून देईल, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.” अपक्ष उमेदवारांच्या जोरदार प्रचारामुळे आगामी निवडणुकीत चुरशीची तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.
फोटो :......... 02395
वडोली : गाव भेटीदरम्यान रामकृष्ण वेताळ, अपक्ष उमेदवार विद्या वेताळ, नीलम पिसाळ. (जयंत पाटील : सकाळ छायाचित्रसेवा)
........................................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

