

कोपरगावमध्ये दुबार पेरणीचे संकट
खरिपाचे १०० टक्के पेरण्या ः मका क्षेत्रात वाढ
कोपरगाव, ता. १५ ः यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात ३४६९० हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली आहे. मध्यंतरी झालेल्या पावसाच्या बळावर शेतकऱ्यांनी मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, तसेच इतर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या. मात्र, आता पाऊसच नसल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. येत्या चार दिवसांत पाऊस पडला नाही, तर दुबार पेरणीच्या संकटाची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात यंदा १५ जुलैअखेर १०० टक्के म्हणजे ३४६९० हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनावणे यांनी म्हणाले, तालुक्यात तीन कृषी मंडळ आहे. कोपरगावमध्ये १५१४१, कोळपेवाडीमध्ये ९४१८.३०, तर पोहेगाव मंडळात १०१३०.९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने पिकांच्या उगवण व वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वच शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचे मोठे हाल होत आहे. यंदा तालुक्यात मक्याच्या पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. भविष्यात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी मका पीक महत्त्वाचे मानले जात असल्याने पशुपालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. तथापि सध्या पिकांना वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकटही ओढवू शकते. अनेक ठिकाणी पेरणी केलेल्या शेतांमध्ये जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, उगवलेल्या रोपांवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आकाशाकडे लागले आहे. लवकरच दमदार पाऊस होऊन पिकांना जीवनदान मिळावे, अशी आशा बळीराजा लावून आहे.
----------
कोपरगावमध्ये १०० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पीक विमासाठी ३१ जुलै मुदत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा उतरून घ्यावा.
- मनोज सोनावणे, तालुका कृषी अधिकारी, कोपरगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.